‘ऑपरेशन रोमियो’ रिलीज ; काय आहे स्टोरी ?

ऑपरेशन रोमियो
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आज ‘ऑपरेशन रोमियो’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आज या उत्सुकतेचा शेवट झाला आहे.  नीरज पांडे यांनी निर्मित केलेला हा थ्रिलर चित्रपट असून  चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

हा चित्रपट  २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क-नॉट लव्ह स्टोरी’ या मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे. याअगोदर नीरज पांडे यांनी ‘रुस्तम’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘बेबी’, यांसारखे दमदार चित्रपट बनविले आहेत.

‘ऑपरेशन रोमियो’ चित्रपटात अभिनेता सिद्धांत गुप्ता आणि वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  ज्यामध्ये मनोरंजन आणि मजा थेट बघायला मिळणार आहे. 

ट्रेलरच्या सुरुवातीलाच दोन तरुणांची प्रेमकहाणी दिसते. जे अचानक एका भयानक दृश्यात बदलते.  या चित्रपटात अभिनेता सिद्धांत प्रेक्षकांना त्याच्याकडे आकर्षित करताना दिसणार आहे.  याआधी तो ‘इनसाइड एज 3’ मध्ये काश्मीरचा फिरकी गोलंदाज इमादची भूमिका साकारताना दिसला होता.

दुसरीकडे, वेदिका पिंटो याआधी ‘लिग्गी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.  शशांत शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.  अभिनेता सिद्धांत गुप्ताने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन शोमधून केली होती. 

‘जश्न-ए-इश्क’ या टेलिव्हिजन मालिकेतून त्याने आपली छाप सोडली आहे.  त्याचबरोबर वेदिका पिंटो या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.  या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल ती खूप उत्सुक आहे, पण तिच्यासाठी हा चित्रपट तितकाच आव्हानांनी भरलेला होता.

या चित्रपटाची निर्मिती शीतल भाटिया यांनी केली असून रिलायन्स एंटरटेनमेंटच्या मदतीने सादर करण्यात आली आहे.  हा चित्रपट 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेते शरद केळकर खलनायकाच्या भूमिकेत

 ‘ऑपरेशन रोमियो’ या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका शरद केळकर यांनी केली आहे. लय भारी या मराठी चित्रपटानंतर तो ‘ऑपरेशन रोमियो’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे.

याबाबत शरद केळकर म्हणतात, म्हणतात की, त्यानी साकारलेल्या पात्रापैकी हे सर्वात अस्वस्थ वास्तववादी पात्रांपैकी एक आहे.  मला वाटते की गेल्या काही वर्षांत मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत, परंतु ही एक युनिक स्टोरी आहे.

काय आहे चित्रपटाची स्टोरी ?

मुंबईतल्या थंडगार वातावरणात कारमध्ये गाणे वाजवत जाणाऱा तरुण मुलगा आणि  समोरच्या सीटवर बसलेली मुलगी नायिका दिसत आहे.  ‘फर्स्ट नाईट’ साजरी करण्याची मनात इच्छा असणारा तरुण निर्जन पार्किंगमध्ये कार पार्क करतो.

दोघांनाही एकमेकांच्या कुशीत राहायचे असते, की खिडकीवर अनोखी व्यक्ती ठोठावतो.  गब्रूसारखी दिसणारी ही व्यक्ती स्वतःला पोलीस असल्याचे सांगते.  मुलीला त्याच्यासोबत मागच्या सीटवर बसवतो. त्याचा साथीदार त्या तरुणाच्या शेजारी बसतो. आणि पुढची स्टोरी तुम्ही चित्रपट गृहांमध्ये जाऊनच पाहा.

हे पण वाचा की :

IAS टीना डाबी झाली लातूरची सून, मराठमोळ्या प्रदीप गावंडेसोबत घेतले ‘सात फेरे’

नेटफ्लिक्सला मोठा झटका ; 100 दिवसांत लाखोंनी घटले सब्सक्राइबर

पैसो के आगे मैं झुकेगा नहीं साला, अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची जाहिरात


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *