एका कोरोना रुग्णाकडून ४०६ जणांना होऊ शकते बाधा; जाणून घ्या

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना संक्रमित रुग्ण मिळत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणांवर आळा घालण्यासाठी कोरोनाचा प्रसार थांबविणे आताच्या घडीला महत्वाचे आहे. यासाठी आरोग्यविभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिक त्या सूचना पाळताना दिसून येत नसल्याचे लक्षात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, नियमीत मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ करणे यासह अन्य् सूचना आरोग्यविभागाकडून करण्यात आल्या आहे. दरम्यान नुकत्याच एका संशोधना द्वारे असं समोर आले आहे की, एक व्यक्ती ३० दिवसात तब्बल ४०६ जणांना बाधित करु शकतो. अशी धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग किती महत्वाचे आहे हे आपल्याला या संशोधनावरुन लक्षात येत असेल. तसेच या संशोधनामध्ये तज्ञांच्या हेही लक्षात आले की, शारीरिक संपर्क ५० टक्क्यांनी कमी झाला तर त्याच कालावधीत १५ लोकांना बाधा होऊ शकते. त्याचबरोबर हे प्रमाण ७५ टक्क्यांनी कमी झाले तर एक व्यक्ती ३० दिवसात सुमारे ३ लोकांना बाधित करु शकतो.
केंद्र सरकाने या संशोधनाच्या आधारावर आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी एक पत्रकारपरिषद घेतली व त्यामध्ये ही माहीती दिली. यामध्ये ते म्हणाले की, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल. मास्क व सोशल डिस्टन्सिंग याच्या आधारावर कोरोना थांबवलं जाऊ शकतं असं एका संशोधनाव्दारे लक्षात आले आहे.
संशोधनात समोर आलं आहे त्यानुसार, जरी आपण सहा फुटांचं अंतर ठेवलं तरी करोना पॉझिटिव्ह व्यक्ती संक्रमित नसलेल्या व्यक्तीकडे विषाणूंचं संक्रमण करण्याची शक्यता आहे. घरात विलगीकरणात असताना अशी परिस्थिती उद्भवू शकते. जर मास्कचा नीट वापर केला नाही तर करोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होण्याची शक्यता ९० टक्के असते असं आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.