कधीकाळी निर्मात्याने हेमा मालिनी मध्ये स्टार बनण्याची पात्रता नाही म्हणत, चित्रपटातून बेदखल केले होते.

Once upon a time the producer was ousted from the film, saying he did not deserve to be a star in Hema Malini.
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

१९६८ सालच्या ‘सपनो का सौदागर’ ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७०च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. इतक्या यशस्वी अभिनेत्रीला एका तामिळी निर्मात्याने कधीकाळी असा शेरा मारला होता की, ‘हेमा मालिनी मध्ये स्टार बनण्याची पात्रताच नाही.’ ही घटना हाती तेंव्हाची जेंव्हा हेमा नुकत्याच नृत्य क्षेत्रात आपले नाव कमावीत होत्या.

नृत्य क्षेत्रात हेमा यांची वेगानं प्रगती होत होती आणि त्याच सुमारास एक अनपेक्षित घटना घडली. हेमाला चित्रपट निर्मात्याकडून ऑफर्स येऊ लागल्या. हेमा या तेव्हा जेमतेम चौदा वर्षाची होती. स्टेजवरच्या गुणी कलाकार आला आणि त्याला चित्रपटात न्यायचं ही सिनेमावाल्यांची जुनी सवय परंपराच होती. कलाक्षेत्रात हेमाचं नाव होऊ लागलं तेव्हा चित्रपट निर्मात्याचं लक्ष तिच्याकडे जाणं स्वाभाविक होतं. तिला एका पाठोपाठ चित्रपटांसाठी निमंत्रणे येऊ लागली. तिला सर्वात पहिली ऑफर होती तामिळ निर्मिती वेल्लू मणी यांची. पाठोपाठ आणखी एका तामिळ निर्मात्याने तिला बोलावलं.

गंमतीची गोष्ट म्हणजे तोपर्यंत हेमा यांची चित्रपटांची आवड राहिली दूरच चित्रपट काय असतो कसा बनतो याची ही त्यांना कल्पना नव्हती. नृत्यामध्ये घडलेल्या हेमा यांना सिनेमा पाहायला वेळच मिळत नसायचा. एकंदरीत चक्रवर्ती कुटुंबाला सिनेमाचं खास असं कौतुक किंवा आकर्षण नव्हतं. हेमा यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतर चित्रपट पाहायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी करमणूक म्हणजे नृत्याचा नाहीतर गायनाचा कार्यक्रम होता. त्यांच्या आईची इच्छा होती तिच्या मुलींना नर्तिका म्हणून नाव मिळवावं. ती कधीकाळी फिल्मस्टार बनेल अशी कल्पना तिने स्वप्नात सुद्धा केली नव्हती.

दरम्यान हेमा यांच्या दोघा भावांचे कॉलेज शिक्षण संपलं होतं. दोघे भाऊ आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर होते. तरीही आपल्या धाकट्या बहिणीकडे त्यांचं लक्ष होतं. अशातच एक तमिळ चित्रपट निर्मिती करणारे चक्रवर्ती यांच्या घरी आले. आणि त्यानं अख्या घराला जणू शॉक दिला. ते हेमाला सिनेमाची हिरोईन बनवायला निघाले होते! त्यांनी ऐकताक्षणी ची ऑफर सरळ नाकारली. मात्र हेमा यांच्या आईच्या मनात मात्र वेगळा विचार चालू होता. त्यांना चित्रपट व्यवसाय बद्दल काहीच माहिती नव्हती.

मात्र या क्षेत्रात त्यांचे काही जणांशी ओळख होती. ओळखीच्या लोकांचं मत घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्या लोकांचं म्हणणं पडलं की, चक्रवर्तीने या मागणीचा अवश्य विचार करावा. कारण तो निर्मिती म्हणजे सिनेसृष्टीतल्या बंड प्रस्थ आहे. परंतु हेमा यांच्या वडिलांना हे मुळीच पटलं नाही. त्यांना हेमाने चित्रपटात काम करावं हे मंजूर नव्हतं. खरंतर हेमा देखील सिनेमात काम करायला मुळीच उत्सुक नव्हत्या. परंतु हेमा यांच्या आईचं म्हणणं होतं की, तू एक सिनेमा करून बघ तो अनुभव आवडला नाही. तर आपण तिथेच थांबू. हा विचार हेमाला पटला.

दुसर्‍याच दिवशी त्या चित्रपटाच्या निर्मात्याने थाटामाटात चित्रपटाची घोषणा केली. त्या चित्रपटात असणाऱ्या दोन्ही नायिका म्हणजेच, जयललिता आणि हेमा यांच्यावर वृत्तपत्रातून स्तुतीसुमने उधळली. (जयललिता पुढे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या.) हेमा मालिनी हे नाव मात्र सिनेमाचा हिरॉईनचा शोभेसं नाही, असं त्या चित्रपट निर्मात्याला वाटलं. म्हणून त्यांनी नाव बदलण्याचा आग्रह धरला. हेमा यांच्यासाठी सुजाता हे नाव त्याने सुचवलं. जया चक्रवर्तीनी त्यासाठी समंती दिली परंतु दुःखाने! रीतसर पत्रकार परिषद घेऊन त्या बड्या निर्मात्यांनं या चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं. दोन्ही नायिकासाठी त्यांना भरमसाठ महागडे पोषाख तयार करून घेतले.

अर्थात हेमा यांचा तो पहिला चित्रपट होता. सगळं वातावरण त्यांना नवखं होतं. त्या काळात हेमा वरकरणी शांत दिसायची, पण आतल्या आत मात्र ती धसकली होती. त्यांच्या मनातली भीती दिवसेंदिवस वाढत होती. सिनेमाच्या सेटवर सर्वस्वी निराळं वातावरण तिला आणखी नाउमेद करीत होतं. यावेळी नशीब देखील हेमा यांना साथ देत नव्हतं. ध्यानीमनी नसताना तिच्यावर जबर प्रहार झाला. मदुराई मध्ये काही महिने शूटिंग केल्यानंतर एका भल्या सकाळी चक्रवर्ती दाम्पत्याला एका वृत्तपत्रात विचित्र बातमी आढळली. हेमा यांना पहिली संधी देणाऱ्या त्या निर्मात्यानं हेमाला चित्रपटातून काढून टाकलं होतं आणि तिच्या जागी दुसर्‍या अभिनेत्रीला घेतलं होतं.

या घटनेबद्दल हेमाची प्रतिक्रिया स्वाभाविकपणे हळवी होती. तिच्यासाठी तो जबर धक्का होता. कुणीतरी खाडकन चपराक मारली असं तिला वाटत होतं. ध्यानीमनी नसताना! काही काम द्या म्हणून त्या निर्मात्याकडे हेमा त्याच्यामागे लागल्या नव्हत्या, प्रत्यक्ष भेटल्याविनाच त्या निर्मात्याने हेमा यांना सिनेमातून काढणं भयंकर अपमानास्पद आणि लाजिरवाणं होतं. ‘हेमा यांच्यामध्ये स्टार बनण्याची पात्रताच नाही’ असा शेरा त्या निर्मात्याने एका पत्रकाराला मुलाखत देताना मारला होता. हे सांगताना आजही हेमाचा स्वर दुखरा होतो. त्या सिनेमात काम करताना आपण नसत्या फंदात पडलो असं त्यांना सारखं वाटत राहायचं. त्या निर्मात्याच्या निर्णयापेक्षा त्याची वागण्याची तऱ्हा सर्वांनाच खटकली होती. त्याने हा निर्णय परस्पर जगजाहीर करण्याएवजी आधी आम्हाला सांगायला हवा होता असा चक्रवर्ती कुटुंबाला वाटत होतं. आधी स्वतः होऊन बोलवायचं आणि नंतर घालून द्यायचं आणि तेही कारण सांगता ही पद्धत चुकीचीच होती.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *