डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने असे केले अभिवादन

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने एक अनोखा उपक्रम करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तृत्वाचे असंख्य पैलू उलगडणाऱ्या “प्रज्ञासूर्य” या अभिवादन ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्रभरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंचा अभ्यास असलेले डॉ.रावसाहेब कसबे, प्रा.डॉ.प्रकाश पवार,डॉ.यशवंत मनोहर,प्रा.हरी नरके,डॉ.श्रीपाल सबनीस, जयदेव डोळे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. श्रीमंत कोकाटे, अरुण खोरे, विजय चोरमारे, राज कुलकर्णी, गंगाधर बनबरे,डॉ.विजय खरे ,डॉ. किरण गायकवाड, कैलास अंभुरे, डॉ. विशाल पतंगे, डॉ.ह.नि. सोनकांबळे या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मान्यवर लेखकांच्या लेखांचा तसेच ज्येष्ठ कवी फ. मू.शिंदे , प्रशांत मोरे, केशव खटिंग, वीरा राठोड,नारायण पुरी, स्वप्निल चौधरी, निलेश चव्हाण,धम्मपाल जाधव, भाग्यश्री केसकर या मान्यवर कवींच्या कवितांचा अभिवादन ग्रंथात समावेश आहे.

या अभिवादन ग्रंथाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे संपादक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व संपादक व प्रदेश सरचिटणीस अमित कुटे उपस्थिती होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *