पहिल्या दिवशी २९ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी केली नोंदणी

दिल्ली: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्याला सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांसाठी १ मार्च पासून लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्यादिवशी २९ लाख जणांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
सोमवार, १ मार्च पासून ६० वर्षावरील आणि ४५ वर्षावरील व्याधी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी कोविन-१९ आणि आरोग्य सेतू या अॅप वरून नोंदणी करावी लागते. पहिल्याच दिवशी २९ लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
याबाबत डॉ. हर्षवर्धन म्हणाले, खर तर २९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी नोदणी केली आहे. एकाच मोबाईलवरून ४ ते ५ जणांनी नोदणी केली आहे. त्यामुळे हा आकडा १ कोटींच्या जवळपास आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्यात पोलीस, शिक्षक, शासकीय कर्मचारी आदींना लस देण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्यात ६० वर्षावरील आणि ४५ वर्षावरील व्याधी असणाऱ्या सामान्य नागरिकांना लस देण्यात येत आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी ६० वर्षावरील १ लाख २८ हजार ६८० जणांनी लस घेतली. तर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षावरील १८ हजार ५०० नागरिकांनी लस घेतली असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. तसेच जरी लस घेतली तरीही कोरोना बाबत काळजी घ्यावी लागणार असल्याचा पुन्हा एकदा त्यांनी सांगीतले.
पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लस घेतली आहे. तर अनेक राज्यात लसीकरणा दरम्यान गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.