Tuesday, October 4, 2022
HomeUncategorizedएकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’...

एकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होण्यापूर्वीच करोडो कमावलेत…

‘अमीर खान प्रोडकशन्स’ आणि ‘व्याक्यूम18स्टुडिओज’ यांनी सयुंक्तपणे काढलेला ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच 160 कोटी कमवले आहेत. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला सर्वत्र चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात स्वतः अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ ची भूमिका केली आहे. तर करिना कपूरने चित्रपटातील रूपा नावाचं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शकन अद्व्यैत चंदन यांनी केलं आहे. चित्रपटात स्वतः अमीर खान असल्यामुळे त्याचे सर्व चाहते चित्रपटाची प्रचंड आतुरतेन वाट पाहत आहे.

‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपटा 1994 मध्ये आलेल्या Forest Gump या चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट तब्बल 100 विविध भारतीय स्थळांमध्ये शूट करण्यात आला आहे.

चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर 29 मे 2022 रोजी झाला होता. हा चित्रपट काढायला 180 कोटी लागले आहेत. पण विशेष म्हणजे त्यापैकी 160 कोटी तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वसूल झाले आहेत.

प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाने कमाई केली तरी कशी ?

‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वी 160 कमावले कसे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. किंबहुना या बातमी मुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतुहूल वाढले आहे.

खरतर तर हा चित्रपट चित्रपट-गृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्ल्याटफॉर्मवर प्रकशित करण्याचे हक्क नेटफ्लिक्सला विकले आहेत. त्या बदल्यात 160 कोटी रुपये निर्मात्यांना मिळणार आहेत.

असे असले तरी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नेमका कधी येणार आहे? हे मात्र अध्याप स्पष्ट झाले नाही. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यात्त नेटफ्लिक्सवर येण्याची शक्यता व्यक्त केली जाता आहे.

थिएटर्स आणि ओटीटी या दोन्ही माध्यमातून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असल्यमुळे याला प्रचंड प्रेक्षक वर्ग लाभेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लाल सिंह चड्ढाला ‘रक्षा बंधन’ची टक्कर!

अमीर खान च्या या चित्रपटाकडे फक्त प्रेक्षकच नाही तर सर्व बॉलीवूड चित्रपट निर्माते देखील लक्ष लावून बसले आहेत. नागा चैतन्य हा साउथचा अभिनेताही देखील या चित्रपटात असल्यामुळे अधिकच भर पडली आहे.

अक्षय कुमार चा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि कंगना रनौत चा ‘धाकड़’ सारख्या चित्रपटांला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर लाल सिंह चढ्ढाचं नेमकं काय होणार ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. एवढंच नाही तर ट्रेड एनालिस्टचे देखील या चित्रपटाच्या कमाईवर नजरा लागल्या आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे 11 ऑगस्टला अक्षय कुमारचा रक्षा बंधन हा देखील चित्रपट प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट अमीर खानच्या या चित्रपटाला टक्कर देणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे.

अधिक वाचा :

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो??? वाचा सविस्तर…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments