जुन्या वाहनांना मोफत जीपीएस बसविण्यात येणार

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली : वर्षभरात टोल घेण्याची व्यवस्था रद्द करून फास्ट टॅगची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली. सोबतच जुन्या गाड्यामध्ये मोफत जीपीएस सुविधा लावून देऊ, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसभेत चर्चे दरम्यान उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी टोल प्लाझाबाबत सांगितले. तसेच त्यांनी मागच्या सरकारने रस्ते प्रकल्पाच्या कंत्राटामध्ये आणखी मलई टाकण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोलप्लाझा बांधले गेले आहेत. हे अन्यायकारक आणि चुकीचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

आता जर टोल प्लाझा हटविले तर रस्ता बनविणाऱ्या कंपन्याचे नुकसान होईल. आणि ते भरपाई मागतील. परंतु, सरकारने एका वर्षात सगळे टोल संपुष्टात आणण्याची योजना हाती घेतली आहे. याबाबत सरकारचे काम सुरु आहे. येणाऱ्या काळात नागरिकांना टेक्नोलॉजीच्या मदतीने जेवढा रस्त्यावर चालणार तेवढा टोल भरावा लागेल, अशी घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली.

सीसीटीव्ही कॅमेरा एक फोटो घेईल. तसच जिते महामार्ग वरून बाहेर पडाल तेथे एक फोटो घेण्यात येईल. जेवढा प्रवास तुम्ही केला तेवढ्या अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागणार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

जम्मू ते श्रीनगरपर्यंत सरकार नवीन रस्ता बांधत आहे. यादरम्यान रामबन नजीक काही समस्या येत आहेत. कारण जुन्या कंपनीने काम सोडलं आहे. आम्ही नव्या कंपनीसोबत काम सुरु केल आहे. रामाबनच काम पुढच्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.    


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *