Friday, October 7, 2022
Homeथेटर ते स्टेडीयमRR विरोधातील सामना खेळण्याची तयारी नाही, CSK ने BCCI ला कळवलं

RR विरोधातील सामना खेळण्याची तयारी नाही, CSK ने BCCI ला कळवलं

नवी दिल्ली : यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढू लागलं आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्या टीममधले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोमवारी सीएसकेचे २ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामना खेळण्याची तयारी नसल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने बीसीसीआयला (BCCI) कळवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना होणार आहे, त्यावर आता कोरोनाचं सावट दिसतं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत माहिती दिली आहे.
चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया अहवलानुसार, या दोघांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आल्यास मैदानात उतरू अशी भूमिका चेन्नईने घेत बीसीसीआयला त्यासंदर्भात कळवले आहे. आयपीएलच्या SOP नुसार सहा दिवसात तीन चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे त्यानंतरच चैन्नई मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
BCCI च्या SOP नुसार एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास संबंधित व्यक्तींची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी केली जाते. मीडिया अहवालात सीएसकेच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने असं नमुद करण्यात आले की, त्यांनी पुढील सामना (राजस्थान रॉयल्स विरोधातील) खेळण्यास नकार दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘बीसीसीआयला चाचण्यांच्या प्रोटोकॉल बद्दल माहित आणि किती चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक आहे हे देखील माहित आहे. त्यामुळे आम्ही BCCI शी बोललो आहोत. त्यांना हा सामना रिशेड्यूल करावा लागेल.’ या सहा दिवसांच्या कालावधीतल चेन्नईचा आणखी एक सामना असणार आहे, जो सनरायजर्स हैदराबाद विरोधात असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments