पूजाच्या लॅपटॉप बाबत माहिती नाही

पुणे: पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडल्यानंतर तिला रिक्षात उचलून ठेवले. तिच्या फोन, लॅपटॉप बद्दल काहीही कल्पना नाही. अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी दिली. आणि पूजा चव्हाणच्या ऑडीओ क्लीप व्हायरल केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी फेटाळून लावला आहे.
घोगर यांच्यावर पूजाचा लॅपटॉप, फोन चोरल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गणेश बिडकर उपस्थित होते.
यावेळी घोगरे म्हणाले, घटनेपासून माझे घर १०० फुटाच्या अंतरावर आहे. काय घडले आहे पाहण्यसाठी घटनास्थळी गेलो होतो. रक्ताच्या थारोळ्यात १ मुलगी पडली असल्याचे मला दिसले. त्या ठिकाणी दोघेजण हजर होते. त्याच्याबाबत मला काहीही माहिती नव्हते. माणुसकीच्या नात्याने त्या मुलीला रिक्षा उचलून ठेवले आणि हॉस्पिटला पाठविले.
घटनेनंतर पोलिसांना फोन केला. मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. जागेचा ताबा पोलिसांनी घेतला. नगरसेवक म्हणून तिथे गेले. विषयाला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न काही जण करत आहे. पूजा चव्हाण राहत होती त्या इमारतीत मी गेलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. धनराज घोगरे हे भाजपचे नगरसेवक आहेत. वानवडी मधून ते निवडून आले आहेत.