पुणे मनपा हद्दीत आज कोरोना लसीकरण नाही : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र असे असताना लसीचा पुरवठा कमी पडत असल्याकारणाने लसीकरण थांबविण्याची वेळ पुणे महानगरपालिकेवर येत आहे. दरम्यान आज पुणे महानगरपालिका हद्दीतील लसीकरण थांबविण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ”पुणे मनपा हद्दीत सोमवारी कोरोना लसीकरण नाही!, पुणे मनपा हद्दीत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण उद्या बंद राहणार असून लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील माहिती दिली जाईल. तर १८ ते ४४ वयोगटासाठी कमला नेहरू हॉस्पिटल आणि राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळेल.” असी माहिती देण्यात आली आहे.
पुणे मनपा हद्दीत सोमवारी कोरोना लसीकरण नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 2, 2021
पुणे मनपा हद्दीत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण उद्या बंद राहणार असून लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील माहिती दिली जाईल. तर १८ ते ४४ वयोगटासाठी कमला नेहरू हॉस्पिटल आणि राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळेल.