बकबक करणाऱ्या संजय राऊत यांची NIA ने चौकशी करावी- कॉंग्रेस नेत्यांची मागणी
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आणि मनसुख हिरेन त्यांची हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात कोणी घेतले यावरून वाद सुरु झाला आहे. या वादात आता कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे.
संजय निरुपम यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ट्वीट करून निशाणा साधला आहे. संजय राऊत हे काल पर्यंत सचिन वाझे यांना इमानदार म्हणत होते. मात्र ते आता सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेण्याच्या विरोधात होते अस सांगत आहेत. संजय राऊत यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे.
संजय राऊत ने कहा है कि वे #सचिन_वज़े की पुलिस में दुबारा बहाली के खिलाफ थे।हालाँकि वे कल तक वज़े को ईमानदार और सक्षम बता रहे हैं।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 30, 2021
फिर भी वे कौन-से नेता थे जिनके कंधे पर चढ़कर वज़े आया,यह बताना पड़ेगा।#NIA को राऊत जैसे बकबक करनेवालों को उठाकर वज़े के आकाओं तक पहुँचना चाहिए।
याबाबत संजय निरुपम यांनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले “संजय राऊत यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्याच्या विरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी सचिन वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांनी सचिन वाझे कोणाच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेने राऊत यांना उचलून चौकशी करून त्यांच्या सूत्रधार पर्यंत पोहोचावे अस संजय निरुपम म्हणाले.