Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचावृत्तसंपादक ते सुपारी किंग ; बाळ बोठेचा 'भयानक' प्रवास

वृत्तसंपादक ते सुपारी किंग ; बाळ बोठेचा ‘भयानक’ प्रवास

पत्रकार, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राचा वृत्तसंपादक ते सुपारी किंग आणि आता बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळा बोठे … अहमदनगर जिल्ह्यातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या रेखा जरे हत्याकांडात सुपारी दिल्याचा आरोप बाळा बोठेवर आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरेंची नगर – पुणे रोडवरील जातेगावच्या घाटात हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सुपारी बाळा बाठेनेच दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं .

कॅमेरा गेला आणि लेखणी झाली सुरु
अहमदनगरपासून अवघ्या १७ किलोमीटरवर असणाऱ्या वाळकी इथे बाळा बोठे लहानाचा मोठा झाला. कॉलेज शिक्षणानंतर त्याला फोटोग्राफीचा छंद जडला आणि तो फोटोग्राफी करु लागला. काही फोटो वर्तमानपत्रातही येऊ लागले . त्यातच अहमदनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांच्याशी त्याची ओळख झाली. बाळा बोठेतील धडपडेपणा पाहून मिरीकरांनी त्याला पत्रकारितेत आणलं आणि कॅमेरा जाऊन लेखणी हाती आली .

या प्रकरणात बाळा बोठे हिरो झाला
शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन बाळा बोठे करु लागला. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला .

एकतर्फी प्रेमात तरुणी सोबत फसला
याच प्रकरणानंतर बाळा बोठेने जीविताला धोका असल्याचं सांगितलं. आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली . बोठेसोबत २४ तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली. शहरातील लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत बोठेची तगडी ओळख झाली. त्यातच एका तरुणीनं बाळा बोठेवर एकतर्फी प्रेम प्रकरणातून धमकावण्याचे आरोप केले आणि बोठेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हेही प्रकरण शहरात चांगलंच गाजलं, मात्र या प्रकरणात बाळा बोठे निर्दोष सुटला. त्यानंतर बाळा बोठेच्या प्रगतीचा आलेख सरळ वरच्या दिशेनं राहिला .

१९९७ ला बाळ बोठेचं लग्न झालं
 या लग्नात शहरातील सगळे उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. या लग्नाची चर्चाही शहरात रंगली होती . याच काळात अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रात मोठ्या पदांवर मजल मारली. बाळा बोठेने आतापर्यंत काय काय केलं, हे पाहिल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची जाणीव तुम्हाला होईल ! तब्बल २८ वर्ष पत्रकारिता ८ पुस्तकं प्रकाशित, ३ पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी तब्बल १६ विषयांमध्ये मास्टर्स डिग्री राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे ४० पुरस्कार बाळ बोठे ४० हून अधिक देश फिरला, आलिशान बंगला, जमीन जुमला आणि महागड्या गाड्या.

नोव्हेंबर २०२० रेखा जरे हत्याकांड
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती . ३० नोव्हेंबर रोजी नगर – पुणे महामार्गावर ही घटना घडली होती . यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं . त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने ५ आरोपींना गजाआड केलं . मात्र ,जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली , तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments