राज्यात नवीन नियमावली लागू; जाणून घ्या नवीन नियम

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने अखेर कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी किराणा, भाजीपाला, फळविक्री, बेकरी यांना सुट देण्यात आली होती. आता यांच्या वेळेत बदल केला असून ही सर्व दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु राहणार आहे. यानंतर नियमानुसार सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावे लागणार आहे.
नव्या नियमानुसार किराणा, भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन सेंटर यांना सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. असे असले तरीही रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिवरी देता येणार आहे.
हे सुरु राहणार ७ ते ११
किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्री, दुध विक्री, चिकन, मटन, मासे विक्री, कृषी संबधित सेवा, पशु खाद्याची दुकाने हे सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत सुरु राहणे आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळेत बदल होणार असल्याचे संकेत दिले होते.
हे राहणार बंद
धार्मिक स्थळ, आठवडी बाजार, दारूची दुकाने, सर्व खासगी कार्यालये, सलून, चहाची टपरी, मैदाने, सिनेमागृह, सर्व कोचिंग क्लास बंद राहणार आहे.