भारतीय महिला क्रिकेटरचा नवा रेकॉर्ड
मुंबई: भारताचा क्रिकेट संघ रोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. याबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ कमी नाही. मिताली राज या महिला क्रिकेटरणी नवीन रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
मिताली राजनं १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच तिच्या नावावर २०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ हजार ९३८ धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच, सर्वाधिक सलग १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. असं करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू, जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं एक नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. तिनं हा मैलाचा दगड पार करताच BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मिताली राज केवळ ३६ धावा करून बाद झाल्याने तिला आपल्या कामगिरीचा आनंद साजरा करता आला नाही. मिताली राजने आता वनडेमध्ये एकूण ६ हजार ७४ धावा केल्या आहेत आणि ७ हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त ३६ धावा दूर आहे. याशिवाय मिताली राजने टी-२० क्रिकेट मध्ये २ हजार ३६४ धावा केल्या आहेत. तर १० कसोटी सामन्यांमध्ये ६३४ धावा केल्या आहेत.
मिताली राजने पूनम राऊतबरोबर तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. तिसर्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल, अशी प्रार्थना तिचे चाहते आता करत आहेत!