राखी सावंतवर पुन्हा नवीन खटला,जाणून घ्या काय आहे हे नवीन प्रकरण!!!

ड्रामा क्वीन आणि बिगबॉसच्या पहिल्या सिझनमध्ये सहभाग घेणाऱ्या राखी सावंतवर पुन्हा एकदा संकटाची वेळ आली आहे. राखीला आंबोली पोलीसांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या तक्रारीनुसार ताब्यात घेतले होते.
शर्लिनने आपल्या फोटो आणि विडिओच्या लिंक्स प्रसारित करण्यासाठी ही एफ.आय.आर (FIR) नोंदवली. आंबोली पोलीसांनी राखीला ३५४A, ५०९, ५०४ या कलम अंतर्गत चौकशी साठी बोलावले होते.
राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामध्ये या आधी सुद्धा वादाचं वातावरण निर्माण झाले होते. शर्लिन चोप्राने प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक आणि निर्माते ‘साजिद खान’ यांच्यावर #MeToo च्या अंतर्गत शारीरिक शोषणासाठी २०२२ मध्ये खटला नोंदवला होता. त्यावेळी साजिद खानला पाठिंबा देत राखी सावंत खंबीरपणे मीडियासमोर त्यांचं समर्थन करताना दिसली होती. त्यानंतर शर्लिन आणि राखी मध्ये फारसे चांगले संबंध नसल्याचे कळत आहे.
राखी सावंतसाठी वाद आणि पोलीस केसेस काही नवीन नाही. यापूर्वीही राखीवर अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. राखी सावंत “ड्रामा क्वीन” या नावाने देखील एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये ओळखली जाते.
राखी आणि तिच्या कॉंट्रोव्हर्सीज बद्दल जवळपास सर्वेलोकं परिचित आहेत. पंजाबी आणि हिंदी सिनेविश्वातला प्रसिद्ध गायक ‘मिका सिंग’ आणि राखीच्या प्रकरणाने धुमाकूळ घातला होता. २००६ साली हे प्रकरण चर्चेत होतं यानंतर राखीला प्रसिद्धी मिळाली.
रिऍलिटी शोस्ज राखीच्या करियरसाठी उपयोगी ठरलेहे तिच्या करियर ग्राफवरून स्पष्ट दिसते. २०११ साली राखीने तिच्या पार्टनर सोबत ‘नच बलिये ३’ आणि ‘जरा नचके दिखा’ सारख्या रिऍलिटी शोज मध्ये भाग घेतला होता. राखी आणि अभिनेता अभिषेक अवस्थी मध्ये झालेल्या काही वादांमुळे, राखीने मीडियाच्या समोर अभिषेकच्या कानाखाली मारली होती.
हे प्रकरण त्या काळी गाजलं होतं. राखीने स्वतःच्या वक्तव्याने वादाची परिस्तिथी निर्माण केली आहे. राखीने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनच्या आयुष्यावर मीडियासोबत बोलताना अनेक वेळेस टिप्पण्या केल्या होत्या. राखीने सनीच्या भारतात येण्यावर नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या तक्रारी, कॉंट्रोव्हर्सीज चा राखीला प्रसिद्ध मिळवळण्या मध्ये फायदा होतो. प्रसिद्धी मिळवण्याची पद्धतीकडे लोक सोयीनुसार दुर्लक्ष करतात.
आंबोली पोलीस स्टेशन मध्ये राखी सावंत तिच्या नवरा ‘आदिल खान’ सोबत आंबोली पोलीस स्टेशन मधून निघताना दिसली होती. जाताना सुद्धा राखीने तिच्या आगळ्या वेगळ्या अंदाजाने चाहत्यांना निराश केले नाही. पोलीस स्टेशन मधून निघताना राखीने ‘गंगुबाई काठियावाडी’ मधली प्रसिद्ध झालेली “नमस्कार” ही पोज करत आपल्या नवऱ्यासोबत निघून गेली.
या प्रकरणावर राखीच्या भावाने देखील प्रतिक्रिया दिली. राजेश सावंतने राखीला महाराष्ट्रची जान म्हणत शर्लिनच्या तक्रारी बाबत नाराजी व्यक्त केली. राखीला काही होणार नाही असा दावा झूम मीडियाशी बोलताना केला.