‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ सिरीजचं शूटिंग नेटफ्लिक्स कडून रद्द
नेटफ्लिक्स ने ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ ची शूटिंग पूर्णपणे रद्द केली गेली आहे. नेटफ्लिक्सने बाहुबलीः द बिगिनिंगच्या ९ भागांची सिरीज बनवण्याची घोषणा केली होती. याची निर्मिती एस.एस.राजामौली यांनी केली आहे. या सिरीजमध्ये शिवगामीचं आयुष्य दाखवण्यात आलंय. यात शिवगामीचा रोल मृणाल ठाकूरने केलाय.
सिरीजच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि ही सिरीज सर्वोत्तम असावी अशी नेटफ्लिक्सची इच्छा आहे. सिरीजचं पहिलं शूट फारच सुमार असल्यानं झालेलं शूटिंग नेटफ्लिक्सने रद्द करून बाजूला सारलं आहे. झालेल्या कामावर नेटफ्लिक्स समाधानी नसल्यामुळे ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने संपूर्ण शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द राइज ऑफ शिवगामी’ ही कादंबरी लिहिणारे आनंद नीलकंठणसुद्धा त्यांच्या कादंबरीवरील या हिंदी आवृत्तीवर खूष नव्हते. ऑडिबल इंडिया लाँन्चच्या वेळी एका अनौपचारिक मुलाखतीत त्यांनी आपला असंतोष व्यक्त केला होता.
चाहत्यांना निराश होण्याची गरज नाही आता या सीरिजच्या स्क्रिप्ट, स्टार कास्ट आणि तांत्रिक टीम या सगळ्यावर पुन्हा नव्यानं काम केलं जाणार आहे. गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाऊ नये म्हणून नेटफ्लिक्सने हे पाऊल उचलले आहे. नेटफ्लिक्सने निर्मात्यांना ही सिरीज पुन्हा शूट करण्यास सांगितलीये.
आता सीरिजच्या शूटिंग बजेटमध्ये वाढ केली आहे. पूर्वी ते १०० कोटी होते आता दुप्पट २०० कोटी झाले आहे. सीरिजचं शूटिंग नव्यानं चालू झालं आहे . ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंगला’ भारतात गेम ऑफ थ्रोन्स सारखी लोकप्रियता मिळू शकेल असा नेटफ्लिक्सचा विश्वास आहे. त्यामुळेच या सिरीजचं बजेट पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजेच २०० कोटी करण्यात आलं आहे.