|

लठ्ठपणामुळं पोरं खिल्ली उडवायची, तिरंग्याचा अभिमान उंचावणाऱ्या नीरजची कहाणी!

नीरज
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा नीरज चोपडा, ओरेगॉनमधल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. टोकियो ऑलम्पिकनंतर तब्बल 4 किलो वजन कमी करणं हे नीरजसमोर प्रमुख आव्हान होतं.

नीरज चोप्राचा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सशी सामना झाला. यामध्ये नीरजने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं, तर पीटर्सने 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करत पहिले सलग दोन फेल गेले. यासह त्याने अंतिम फेरीत 90.54 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं.

नीरजला तीन थ्रो फाऊल होत होते. त्यात पहिले आणि शेवटचे दोन थ्रो होते. यामुळंच नीरजचे सुवर्णपदक हुकलं. नीरजने अवघ्या तीन थ्रोसह रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत नीरजने 82.39 मीटर, 86.37 मीटर आणि 88.13 मीटर फेकला.

नीराजच्या संघर्षाची कहाणी-

नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. पिळदार शरीरयष्टी असावी असं त्याला वाटत असायचं, पण लहानपणापासून नीरज लठ्ठ होता.

लठ्ठपणामुळे गावातील इतर मुलं त्याची चेष्टा करायची, त्याच्या लठ्ठपणामुळे त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते, त्यामुळे त्याचे काका त्याला वयाच्या 13 व्या वर्षापासून धावण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन जाऊ लागले. पण यानंतरही त्याचं मन धावण्याच्या शर्यतीत लागलं नाही.

स्टेडियममध्ये जाताना त्याने इतर खेळाडूंना तिथे भाला फेकताना पाहिले, त्यानंतर तोही भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला. तिथून त्याने भाला फेकायला सुरुवात केली ती धाव आता ऑलिम्पिक सुवर्णपदकपर्यंत पोहचली आहे. नीरजने सुरुवातीचे शिक्षण पानिपत येथून केलं.

सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोप्राने चंदीगडमधील बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच ग्रॅज्युएशन केलं. नीरजने पोलंडमध्ये 2016 च्या IAAF वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं.

वयाच्या 19व्या वर्षी त्याची लष्करात कनिष्ठ आयोग अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. लष्करातून नोकरी मिळाल्यानंतर नीरजने एका मुलाखतीत सांगितलं,

“माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे आणि मी संयुक्त कुटुंबात राहतो. माझ्या कुटुंबात कोणालाच सरकारी नोकरी नाही. त्यामुळेच सर्वजण माझ्यासाठी आनंदी आहेत. आता मी माझे प्रशिक्षण सुरू ठेवू शकतो तसेच माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतो.”

नीराजची कारकीर्द-

23 वर्षीय नीरज अंजू जागतिक स्तरावरील ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा बॉबी जॉर्जनंतरचा दुसरा भारतीय आहे. त्याने IAAF वर्ल्ड U-20 मध्ये सुवर्णपदक जिंकले. 2016 मध्ये त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 82.23 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर 2017 मध्ये त्याने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही 85.23 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं.

इंडोनेशिया येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 88.06 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भालाफेकमध्ये भारताला आतापर्यंत केवळ दोन पदके मिळाली आहेत. नीरजच्या आधी गुरतेज सिंगने 1982 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या इंडियन ग्रांप्रीमध्ये नीरजने 88.07 मीटर फेक करून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला.

2018 मध्ये झालेल्या कॉमनवेलथ गेम्स, एशियन गेम्समध्ये नीरजने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. तर मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देऊन भारताची मान गर्वाने उंचावली.

नीरजची मेहनत पाहता आगामी काळात नीरज भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा नीरजच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संपुर्ण देशाला देखील नीरजकडून अपेक्षा आहेत.

हे ही वाचा की-


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *