खडसेंना दिलासा, पुढच्या सुनावणी पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश
मुंबई: कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ८ मार्च पर्यंत दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी आज होऊ न शकल्याने ८ मार्च रोजी ही सुनावणी होणार आहे.
एकनाथ खडसे यांच्या भोसरीतील जमीन गैरव्यवहाराची चौकशी ED समोर सुरु आहे. यापूर्वी ED कडून खडसे यांची एकदा चौकशी केली गेली आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, यानंतर या कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालात दाखल केली आहे. खडसे यांच्या या याचिकेवर आज सुनवाई न झाल्याने ८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
सुनावणी पूर्वी अटके सारखी कठोर कारवाई न करण्याचे हमी ED ने न्यायालयात दिली आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवरील सुनावणी होईल.