भाजप आमदाराने राष्ट्रवादीला पाच कोटीचा पक्षनिधी दिला.
पुणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून राज्यात सत्त्ता स्थापन करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या पक्ष निधीत भरघोस वाढ झाली आहे. तर अनेक जणांनी निनावी पद्धतीने पक्षाला मदत केली आहे. राष्ट्रीय पक्षांना आपला वार्षिक आर्थिक ताळेबंद निवडणूक आयोगा कडे सादर करावा लागतो. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीला एकूण ५९ कोटी ९४ लाख रुपयाचा निधी मिळाला आहे. २०१८-२०१९ च्या आर्थिक वर्षात केवळ १२ कोटी ५ लाखाचा निधी मिळाला होता.
आश्चर्य म्हणजे मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा तसेच लोढा डेवलोपर्स चे मालक यांच्या कंपनीने ५ कोटीचा निधी दिल्याचे अहवालातून समोर आले आहे. २०१८-२०१९ पेक्षा २०१९ – २०२० या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीला मिळणारा पक्ष निधीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक म्हणाले, पक्षाला मिळणाऱ्या निधी बाबत संपूर्ण पारदर्शकता आहे. त्यात गूढ असे काही नाही.