Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचादीपिकाच्या मॅनेजरला एनसीबीची धमकी ?

दीपिकाच्या मॅनेजरला एनसीबीची धमकी ?

एनसीबीने आरोप फेटाळले
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला आणि बघता बघता संपूर्ण बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आलं. एनसीबीने (अमली पदार्थविरोधी पथकाने) ड्रग्ज रॅकेटप्रकरणात सखोल चौकशी केली आणि रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. यात सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. करिष्मा प्रकाश हिच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी करिश्माच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी ड्रग्जचा साठा आढळून आला होता. करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर होती. या दोघींमध्ये अमली पदार्थांविषयी देवाणघेवाण झाल्याचे मोबाईल चॅटस समोर आले होते. यानंतर एनसीबीकडून करिश्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांची चौकशी करण्यात आली होती.
या सगळ्यात करिष्मा प्रकाश हिने मात्र आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला होता. तुम्ही वकील बदलावा. अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले होते. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे. एनसीबीने यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन माहिती दिली. करिष्माविरोधात कठोर कलम लावण्याचे पहिल्यापासून ठरले होते, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

करिष्मा प्रकाशवर कोणते आरोप?
एनसीबीने करिष्मा प्रकाश हिच्यावर एनडीपीएस कायद्यातील कलम 27-अ हे कठोर कलमही लावले होते. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पैसा पुरवणे आणि यातील गुन्हेगारांना आश्रय देणे, याबद्दल हे कलम असून, त्याअंतर्गत दोषीला 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ‘एनसीबी’ने करिष्माला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासही तीव्र विरोध दर्शवला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments