नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है… म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांचा नवाब मलिक यांच्यावर पलटवार

पुणे : गोंदिया जिल्हा ऑक्सिजन अभावी १५ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर केला. याबाबत त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत कामचुकारपणावर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप नवाब मलिक करत असल्याचे सांगितले.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपल्या कामचुकारपणावर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करतायेत. अशा संकटाच्यावेळी त्या कुटुंबियांना मदत करण्याऐवजी ते आपली राजकीय पोळी भाजतायेत. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है.
उलट आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखलघेण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत हात झटकले. ॲाक्सिजन अभावी हे मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलंय. ही कोणती संवेदनशीलता? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
मागच्या दिड वर्षापासून फ्रंटलाईनवर अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॅाक्टरांशी सरकारला साधा संवादही करावासा वाटत नाही. कालच मला कळाले आरोग्य कर्मचारी व डॅाक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
सगळ्या गोष्टीजनतेकडून अपेक्षित आहेत, पण सरकारचा कसलाही ॲक्शन प्लान नाही. सगळा बेशरमपणाचा कळस सरकारने गाठलाय अशीही त्यांनी यावेळी केली.
अशा संकटाच्या काळात जे उद्योजक महाराष्ट्रात रेमेडिसिवरचा पुरवठा करण्यासाठी स्वता पुढाकार घेतायेत, त्यांनाच चौकशीला बोलवून पोलिसांच्या बळाचा वापर केला जातोय. यातून आपला हेतू स्पष्ट दिसून येतोय.
असे वाटते की, राजेंद्र शिंदेंना आता शंभर कोटीचं टारगेट दिले आहे. त्यामुळेच ते सरकारी यंत्रणाचा गैरवापर करत आहेत. असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.