नवाब मलिक यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप; रेमडेसिविर बाबत केला मोठा खुलासा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३ वेळा फोन केल्याचे समोर आल्या नंतर आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
नवाब मलिक म्हणाले, निर्यात करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारने रेमडेसिविर बाबत विचारले असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राला औषध देऊ नये, अस केंद्र सरकारने या कंपन्यांना आदेश दिला आहे. या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषध दिली, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा त्यांना दिला आहे.
“आजच्या परिस्थिती या कंपन्यांकडून रेमडेसिविरचां साठा जप्त करून गरजूपर्यंत पोहचविण्या शिवाय महाराष्ट्र सरकारकडे पर्याय उरणार नाही” असही नवाब मलिक म्हणाले.
Instead making such wild and baseless allegations, Nawab Malik should provide proof or else should apologise. It is a high time that MVA stops blame game and does its job of handling the pandemic https://t.co/OFxTqS7gJV
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 17, 2021
नवाब मलिक यांच्याकडून या गंभीर आरोप नंतर महाराष्ट्र भाजपकडून याचे खंडन करण्यात आले आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे.
उपाध्ये म्हणाले, नवाब मलिक यांनी असे निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे पुरावे असतील तर रे द्यावे, अन्यथा माफी मागावी. महाविकास आघाडीने आरोप करण्याचा खेळ थांबवून साथ कशी रोखता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.