राष्ट्रीय बँकांचे खासगीकरण होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूचक वक्तव्य
दिल्ली: केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना व या व्यतिरिक्त इतर योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीय बँकांचे आता खासगीकरण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. सर्वच काम सरकारने करण्याची गरज नसल्याचे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासंदर्भात सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, सगळ्याच क्षेत्रात सरकारने असण्याची गरज नाही. व्यवसाय करण हे सरकारच काम नाही. तर व्यवसायाला सहकार्य करण ही सरकारची भूमिका आहे.पंतप्रधान मोदी (DIPAM) विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मोदी यांच्या सूचक वक्तव्यानंतर बँकाच्या खासगीकरण बाबत चर्चा होत आहे. जर या बँकांचे खासगीकरण झाले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचविणार असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
सार्वजनिक बँकाचे खासगीकरण हे भाजपच्या अजेंडा वरचा विषय आहे. या बँकाचे टप्याटप्याने खासगीकरण करण्यात येणार आहे. मोदी यांच्या वक्तव्यानंतर खासगीकरनाला जोर येणार आहे.