नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोनाची लस भारतात होणार विकसित

खर्च आणि वेळ वाचणार
हैदराबाद : भारताच्या कोरोना लसीकरणाच्या यशोगाथेत आणखी एका सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. भारत बायोटेकने नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोनाची लस बनविली आहे. या लसीला सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने परवानगी दिली आहे. यामुळे महत्वाचे म्हणजे वेळेबरोबरच खूप मोठ्या प्रमाणात खर्च कमी होणार आहे.
भारत बायोटेकने बीबीवी१५४ कोरोना लसीची निर्मित केली होती. २ मार्च रोजी सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने भारत बायोटेकच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीच्या चाचणीला परवानगी दिली होती.
हैदराबाद येथे चाचणीसाठी १० लोकांची निवड करण्यात आली होती. त्यातील 2 रुग्णांना ही लस देण्यात आली होती. आणि त्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारत बायोटेकने दिली.
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसी पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. नवी लस नाकाद्वारे दिली जाणार आहे.
या लसीचा केवळ एकाच डोस घावा लागणार आहे. त्यामुळे लसीकरणावरील होणारा खर्च कमी होणार आहे. म्हणूनच चाचणी यशस्वी ठरल्यास कोरोना लसीकरण अधिक स्वस्त होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर लासींपेक्षा ही लास देणे अधिक सोपे असल्याचं तज्ञांच म्हणणं आहे. भारत बायोटेकने जानेवारीमध्ये दोन टप्प्यात या लसीची चाचणी करण्यासाठी अर्ज केला होता.