Sunday, September 25, 2022
HomeUncategorizedमोदी विरुद्ध मोदी ; प्रल्हाद मोदींनी याअगोदरही बंधूंवर टीका केलेली आहे..

मोदी विरुद्ध मोदी ; प्रल्हाद मोदींनी याअगोदरही बंधूंवर टीका केलेली आहे..

आर्थिक मंदी आणि महागाई या मुद्द्यांवरून केंद्र सरकार निशाण्यावर आले आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीचा आलेख चढताच पाहायला मिळत आहे.

यामुळे विरोधक केद्र सरकारवर टीका करत आहे. सामान्य, मध्यमवर्गीय लोकांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनीही महागाईवर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे.

अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीने जंतरमंतरील आंदोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं, उपाशी मरु का? असा सवाल केल्याने देशभर त्यांच्या विधानाची चर्चा सुरु आहे.

मोदी विरुद्ध मोदी

प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर देखील त्यांनी आपल्या भावावर टीकेचा आसूड ओढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हण नका, उलट चहावाल्याचा मुलगा म्हणा. कारण चहा आमचे वडील विकत होते. त्यांनी इवल्याशा टपरीवर चहा विकून आम्हा सहा भावंडांना मोठे केले आहे. तुम्ही पंतप्रधानांना चहावाला बोलून मोठी चूक करताय’, असे ते म्हणाले होते.

अनेक आंदोलनांमध्ये सहभाग

प्रल्हाद मोदी हे वेगवेगळ्या आंदोलनच्या माध्यमात सक्रीय असतात. मागच्या काही दिवसांपूर्वीच ते लखनौ पोलिसांच्या या वागणुकीमुळे संतप्त झाले होते. यामुळेच त्यांनी अमौसी विमानतळावर धरणे धरले होते. त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रल्हाद मोदी यांच्या संतापाचा कडेलोट झाला होत.

जीएसटी भरू नका

करोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना ‘एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या’, असे आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केले होते.

करोना आणि लॉकडाऊनमुळं अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्याने त्यांनी असे आवाहन केले होते.

अधिक वाचा :

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments