Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयस्मिता ठाकरेंमुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले ?

स्मिता ठाकरेंमुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले ?

बाळासाहेब ठाकेरेंनंतर, शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? या प्रश्नाच खुलासा करताना एकेकाळी उद्धव, राज यांच्या पाठोपाठ स्मिता ठाकेरेंचं देखील नाव घायला लागायचं. उद्धव ठाकरेंचे बंधू ‘जयदेव ठाकरे’ यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे स्मिता ठाकरे.

एकेकाळी, स्मिता ठाकरे यांचा शिवसेनेवर प्रचंड वचक होता. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला फार किंमत होती. बऱ्याच काळासाठी त्या शिवसेनेचं सत्ताकेंद्र बनल्या होत्या. देशातील उद्योगपती इतकेच नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी स्मिता ठाकरेंशी संपर्क करायला लागायचा.

पण या स्मिता ठाकरे कोण होत्या? आणि ‘ठाकरे’ घराण्याशी त्या कशा जोडल्या गेल्या?

जयदेव ठाकरेंच्या पत्नी, जयश्री ठाकरे एका पार्लरमध्ये जायच्या. ते पार्लर ‘स्मिता चित्रे’ नावाची एक मुलगी चालवत असे. हीच मुलगी एका ठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून देखील काम करत होती. या पार्लरच्याच माध्यामतून जयदेव आणि स्मिता यांच्यातील संवाद वाढला.

पुढे जयदेव यांनी जयश्री यांना सोडचिट्टी दिली आणि स्मिता यांच्याशी विवाह केला. १९८७ साली त्यांचा विवाह झाल्यानंतर स्मिता ठाकरे फार उशिरा १९९८ नंतर राजकारणात सक्रीय झाल्या.. पुढे हळूहळू शिवसेनेतील त्यांचा संपर्क आणि वजन वाढलं.

बाळासाहेबांना देखील त्या कार्यनिष्ठ वाटू लागल्या. अनेक लोक तर उद्धव आणि राज यांच्या पाठोपाठ शिवसेनचं भवितव्य म्हणून स्मिता ठाकरे याचं नाव पुढे करू लागले. याच वादाला तोंड फोडून पुढे राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. मग मात्र उद्धव यांच्या एकमेव प्रतीस्पर्धी या स्मिता ठाकरे उरल्या!

२००३ पर्यंत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेची सर्व सूत्र उद्धव यांच्या हातात येताच स्मिता यांच्या राजकीय मागण्या दुर्लक्षित होऊ लागल्या. म्हणूनच स्मिता ठाकरे यांना राज्यसभेचं सदस्यपद हवं असून देखील मिळालं नाही. अशाच काही गोष्टींमुळे स्मिता ठाकरेंना राजकारनातून मागे यावं लागलं.

राणेंच्या मुख्यमंत्री पदासाठी स्मिता ठाकरेंची शिफारस!

राजकारण म्हटलं की मोठमोठ्या राजकीय कुटुंबात कौटुंबिक क्लेश आणि सत्तेसाठी चढाओढ आलीच! अशावेळी आपल्याच कुटुंबातील प्रतीस्पर्धकाला शह देण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीला ताकद देण्याची पद्धत काही नवीन नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात हाच प्रकार फार प्रामुख्याने पाहिला मिळतो. ठाकरे कुटुंबियातील राणे विरोधकांना त्याकाळी धक्क्का बसावा म्हणून स्मिता ठाकेरेंनी, १९९९ साली राणेंना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला पुस्ती दिली असल्याचे बोलले जाते.

अधिक वाचा :

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments