नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ही मागणी

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ हजार ६४२ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र यात शेतकरी, सलून, दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आला नाही. यांच्यासाठी पॅकेज मध्ये तर्दुद नाही. या घटकांना उचित न्याय द्यावा अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे. याला कॉंग्रेसने पाठींबा दिला आहे. याकाळात, भाजीपाला, फळबागा व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. सलून दुकान बंद असल्याने यांचे सुद्धा मोठे नुकसान होणार आहे. या दरम्यान सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असणाऱ्याचा डब्बेवाल्यांचा यात समावेश नाही. या सर्व घटकांना सामावून घ्या अशी मागणी पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पटोले यांनी पत्रात लॉकडाऊनला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे सांगत. लोकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता दिसून येत आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्ष खंभीरपणे आपल्यासोबत उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी मध्ये छोट्या व्यावसायिकाकरिता आपण पॅकेज जाहिर केले आहे त्याचे स्वागत. मात्र, पॅकेज मध्ये कधी घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी कॉंग्रेसची भूमिका आग्रही राहणार आहे. अस या पत्रात म्हटले आहे.