“माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, मी अस बोललोच नव्हतो”

सांगली: राज्यभर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यासाठी सरकारने विविध उपाय योजना अमलात आणल्या आहेत. मात्र असे असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी रविवारी पंढरपूर पोटनिवडणुकीत हे वक्तव्य केले होते. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कोरोना या जगातून गेला, असे मला वाटते अस जयंत पाटील म्हणाले होते.
मात्र, आता जयंत पाटील यांनी मी अस बोललोच नव्हतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असा दावा त्यांच्या कडून करण्यात आला आहे. माझ्या बद्दल गैरसमज पसरविण्यात येत आहे. पंढरपूर येथील जाहीर सभेत समोरच्या गर्दीतील नागरिकांनी मास्क घातला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो कि, तुमच्याकडे पाहून जगात कोरोना नाही असेच वाटत. मात्र, असे करू नका. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. दुपारी तीन वाजता मंत्रीमंडळाची बैठक आहे त्यावेळी राज्यात लॉकडाऊन करायचे कि, कडक निर्बंध लावायचे यावर निर्णय होणार आहे. अस मी त्यावेळी म्हणालो होतो असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
मात्र, माध्यमांनी दिवसभर पहिल्या दोन ओळीलाच जास्त प्रसिद्धी दिली. त्यामुळे माझ्या वक्तव्या बाबत गैरसमज निर्माण झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातून अजून काहीच मिळाल नाही. शेवटी देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेले पॅकेज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला मोठी अपेक्षा आहे. आजही आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मिळेल अशी आशा आहे. अजूनही काही मदत मिळाली नाही. ही मदत मिळेल अशी अशा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.