माझं नाव नरेंद्र मोदी नाही. मी खोटं बोलत नाही! राहुल गांधी यांचे टीकास्त्र
दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या डिब्रूगडमध्ये आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. या दरम्यान त्यांनी डिब्रुगडमधील लाहोवाल येथे विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रचारादरम्यान ते तिनसुकीया येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर ते छाबुआ येथील दिनजॉय येथील चहाच्या मळ्यात मजुरांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आसामच्या दौर्यावर आल्या होत्या. चहाच्या मळ्यातले त्यांचे फोटोज व्हायरल झाले होते ज्यात त्या चहाची पानं तोडताना दिसत होत्या.
आपल्या डिब्रूगडमधील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी आरएसएसचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले,’जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकशाही नाकारली जात आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी निदर्शने करीत आहेत आणि सीएए येत आहे. दिल्लीला भेट दिल्यानंतर आसामच्या लोकांनी आपली संस्कृती आणि भाषा विसरू नये. नागपुरात जन्मलेली सैन्य संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवते. लोकशाही म्हणजे आसामच्या आवाजावर आसामचे नियंत्रण असले पाहिजे. जर आपण यात विद्यार्थ्यांचा समावेश केला नाही तर इथे लोकशाही अस्तित्त्वात नाही. तरुणांनी सक्रियपणे राजकारणात उतरावे आणि आसामसाठी संघर्ष करावा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं राज्य लुटलं जात आहे, तेव्हा तुम्ही युद्ध लढलं पाहिजे, परंतु प्रेमळपणे, काठी व दगडांनी नव्हे.’
राहुल गांधींनी प्रचारसभेत दिलेली ५ आश्वासनं –
राहुल गांधी म्हणाले की, चहा बाग कामगारांना ३५१ रुपये रोज देण्याचं भाजपने वचन दिलं होतं, पण त्यांना केवळ १६७ रुपये मिळत आहेत. मी नरेंद्र मोदी नाही. मी खोटं बोलत नाही. आज मी तुम्हाला पाच आश्वासनांची हमी देतो, जर आमचं सरकार बनलं तर आम्ही चहा बाग कामगारांना दिवसाला ३६५ रुपये देऊ. सीएएच्या विरोधात उभं राहू, पाच लाख रोजगार निर्माण करून देऊ. २०० युनिट वीज मोफत देण्यात येईल ,घरगुती महिलांना दोन हजार रुपये दिले जातील. राहुल गांधी म्हणाले की, ‘ आम्ही चहा उद्योगासाठी एक खास मंत्रालय तयार करू जे तुमचे प्रश्न सोडवू शकेल.आमचा जाहीरनामा हा चहा व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांशी बोलून तयार करण्यात आला आहे, बंद दरवाजा मागे बसलेल्या लोकांनी तयार केलेला नाही.