पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल होण्याची शक्यता
मंत्रालयातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणार
मुंबई: देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त केला आहे. अश्यातच पोलीस कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहे.
दरम्यान, कार्यालयीन वेळेत गट विभागणी केली आहे. गट ‘अ’ व गट ‘ब’ वर्गातील अधिकारी १०० टक्के उपस्थित राहतील तर, गट ‘क’ व गट ‘ड’ हे ५० टक्के उपस्थित राहतील. त्यातही २५ टक्के कर्मचाऱ्यांची सकाळी ९ ते सांयकाळी ४ या कालावधीत उपस्थिती असेल. तर उर्वरित २५ टक्के कर्मचारी ११ ते ५ या कालावधीत कार्यरत असतील. तसेच ‘क’ व ‘ड’ चे कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील.आवश्यकता असल्यास वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचार्यांना कामावर बोलवण्यात येईल. तसेच हे कर्मचारी फोनवर सुद्धा उपलब्ध असतील. याच बरोबर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट मध्ये कशा करता येतील. वर्क फ्रोम होम किती विभातील कर्मचाऱ्यांना देता येईल. याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव यांना दिले आहेत. कार्यालयीन वेळेची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री यापूर्वी बोलले होते