मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी
मुंबई: सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. याबाबत सलग दोन दिवसांपासून बैठका घेण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या तपासात समोर आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या तपासात सचिन वाझे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे, मुद्देमाल रेकॉर्डवर घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यावर या प्रकरणाचे खापर फुटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वाच्या मंत्री, नेत्यासोबत बैठक घेण्यात आली होती. सचिन वाझे प्रकणात होणारी नाच्चकी टाळण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक झाली होती. त्यानंतरच पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे बोलण्यात येत होते.
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नागराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. आता परमबीर सिंघ यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबादारी असणार आहे. तर रजनीश सेठ यांच्याकडे पोलीस महासंचालाकाची जबाबदारी असणार आहे.
सरकारचा मोठा निर्णय
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी
सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, डॉ. व्यंकटेशम यांची नवे सुद्धा चर्चेत होती.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिस प्रमुखांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. महत्वाची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत कशी पोचली. पोलीस दलातील उच्च अधिकारी अजूनही फडणवीस यांना माहिती पुरवीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू पासून ते त्यांच्या पत्नीचा पोलिसांना दिलेला जबाब पर्यंत सर्व माहिती लिक झाली. हा प्रश्न सरकार मधील वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. यातून पोलीस आयुक्ताचे काहीच नियंत्रण नाही असा संदेश जातो. पोलीस आयुक्त यांना काढून कडक संदेश देण्यात आला आहे.