Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचामुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंहच राहणार?

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंहच राहणार?

मुंबई: सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. याबबत सलग दोन दिवसांपासून बैठका घेण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या तपासात समोर आले आहे. या संदर्भात मंगळवारी मध्यरात्री पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरू होती. यावेळी परमबीर सिंहच मुंबई पोलीस आयुक्तपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या तपासात सचिन वाझे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे, मुद्देमाल रेकॉर्डवर घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यावर या प्रकरणाचे खापर फुटले आहे. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वाच्या मंत्री, नेत्यासोबत बैठक घेण्यात आली होती. सचिन वाझे प्रकणात होणारी नाच्चकी टाळण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक हेमंत नागराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात मध्यरात्री पर्यंत बैठक चालली. यात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंहच राहणार असल्याचे निश्चित केल्याचे समजते.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक झाली होती. त्यानंतरच पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार अशी चर्चा रंगली होती. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश सेठ हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, डॉ. व्यंकटेशम यांची नवे सुद्धा चर्चेत होती. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिस प्रमुखांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. महत्वाची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत कशी पोचली. पोलीस दलातील उच्च अधिकारी अजूनही फडणवीस यांना माहिती पुरवीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू पासून ते त्यांच्या पत्नीचा पोलिसांना दिलेला जबाब पर्यंत सर्व माहिती लिक झाली. हा प्रश्न सरकार मधील वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. यातून पोलीस आयुक्ताचे काहीच नियंत्रण नाही असा संदेश जातो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments