MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला; विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी भयभीत
पुणे: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाही. राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा घेणे योग्य नाही. ही परीक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी mpsc समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयोगाचे सचिव यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
आयोगाच्या वतीन कालच mpsc ची संयुक्त पूर्व परीक्षा वेळेनुसारच घेण्यात येईल अशी घोषण करण्यात आली आहे. या परीक्षेची पुर्ण तयारी करण्यात आली असून योग्य ती खबरदारी आणि नियमाचे पालन करून परीक्षा घेण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला होता. मात्र, आज mpsc समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयोगाचे सचिव यांना पत्र लिहून परीक्षा १ महिना पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे.
काय लिहिले आहे पत्रात
राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड सुद्धा मिळत नाही. काही दिवसापूर्वी एमपीएससी करणाऱ्या एका विद्यार्थाचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे अनेक विद्यर्थ्यान मध्ये भीतीचे वातावण आहे. तसेच अनेक विद्यार्थी कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहे. मध्यप्रदेश आणि बिहार राज्याने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोना तर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी mpsc समन्वय समितीने केली आहे.
##postponeMPSC@OfficeofUT पुण्यातील परिस्थिती खूप भयाण आहे. #MPSC करणारे जवळपास 30% विद्यार्थी हे कोरोना पोसिटिव्ह आहेत त्यातले बरेच जण अंगावर काढत आहे. त्यामुळे परीक्षा ही एक महिना पुढे गेली पाहिजे. विध्यार्थ्यांनच्या भविष्याचा आणि जीवाचा प्रश्न आहे साहेब.@AjitPawarSpeaks #म pic.twitter.com/3WhORaU5cM
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) April 7, 2021