माजी खासदार संजय काकडे यांना अटक

पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना बुधवारी पुणे पोलिसांनी अटक केली. काही दिवसापूर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे हा कारागृहातून सुटल्यावर मोठी रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे हा खुनाच्या गुन्ह्यात तळोजा कारागृहात होता. खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजानन मारणे याचा समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली होती. यात ३०० पेक्षा अधिक कार सामील झाल्या होत्या. त्यानंतर गजानन मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
माजी खासदार संजय काकडे यांना अटक झाल्या बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दुजोरा दिला आहे.