|

प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही – देवेंद्र फडणवीस

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणात वनविभागातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.

याबाबत ट्वीट करून दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांची तत्काळ नियुक्ती करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून फास्ट ट्रक कोर्टात खटला चालविण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर फडणवीस म्हणाले, “अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते.

खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?

दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांची तत्काळ नियुक्ती करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *