|

मोदींनाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळावी

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात माझाही सहभाग होता. त्यासाठी मी तुरुंगात गेलो होतो असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

            अग्रलेखात मोदींच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अथवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट व पेन्शन मिळावे. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील मोदींसारख्या सैनिकानाही मिळावा. तसेच बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. असा टोला सुद्धा लगाविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या नंतर बांगलादेश मध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. अग्रलेखात त्यावर भाष्य करण्यात आले आहे. मोदींच्या बांगलादेश दौरा संपल्यानंतर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरु केल्या आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशला जायला हवे, हाच एक उपाय आहे. असेही म्हटले आहे.

            राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही टिप्पणी केली आहे. मात्र त्याच वेळी आपल्या पंतप्रधानावर आपला विश्वास असायला हवा, असेही त्यांनी म्हटले. आम्हालाही मोदी यांच्या सांगण्यावरून जनतेने विश्वास ठेवायला हवा आणि त्यांचा यथोचित गौरव व्हावा असे वाटते.   

            इंदिरा गांधीनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केले. यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदींनी सत्याग्रह केला हे शौर्य महत्वाचे असे भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा असा टोला सुद्धा अग्रलेखातून लागविण्यात आला आहे.           


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *