…अखेर कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारची पाऊले पडायला लागलीत!

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२१ पासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागायला सुरुवात झाली आणि एप्रिल येईपर्यंत सर्वत्र थैमान घातले आहे. मोदी सरकार स्वबळावत सत्तेत असल्यामुळे त्यांच्या सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. पण अखेर याचा वापर कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करू लागले आहे. गेल्या १० दिवसात १६ निर्णय घेऊन काही दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे.
हे १६ निर्णय मोदी सरकारने गेल्या १० दिवसात घेतले आहेत:-
- १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण
- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी ४५०० कोटींचे कर्ज
- ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी
- २२ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
- रेमडेसिवीरची किंमत कमी करून आणि उत्पादन वाढ करण्यात आली आहे.
- देशाच्या विविध भागात पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला गेला.
- दिल्लीत केन्टोन्मेंट, लखनऊमध्ये डीआरडीओ आणि छतरपूरमध्ये सैन्याने तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी केली आहे.
- मुंबईतील हाफकीनमध्ये कोव्हॅक्सिन निर्मितीला मान्यता दिली
- केंद्र सरकारने देशातील आपत्कालीन परिस्थितीचा वापर करत परदेशी लसीला ३ दिवसांत मंजुरी
- BPCL मुंबईत जम्बो कोविड सेंटर साठी तातडीने मान्यता दिली.
- PMCARES मधून देशभरात आणखी ५५१ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्राला सर्वाधिक ३४ टक्के रेमडेसिव्हिरचा सर्वाधिक पुरवठा केला असून , येणाऱ्या दहा दिवसांसाठी ४ लाख ३५ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत.
- कोरोनावरील लसी-ऑक्सिजन-उपकरणांवरील सीमाशुल्क आणि आरोग्य सेस माफ करण्यात आला आहे.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ८० कोटी लाभार्थ्यांना २ महिने मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
- रेल्वे पाठोपाठ एअरलिफ्ट करून ऑक्सिजन- औषधांचा देशभरात पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- एका मिनिटात १००० लिटर ऑक्सिजन, ‘तेजस’च्या तंत्रज्ञानाने ऑक्सिजनची निर्मिती करून ते रुग्णांना तातडीने पुरविण्यात आले आहे.
हे घेतलेले निर्णय सकारात्मक परिस्थिती निर्माण करणारी असली तरी अजून तातडीच्या निर्णयाची आवश्यकता आहे.