|

जनतेच्या हितासाठी आमदाराने मोडली ९० लाखांची FD!

MLA breaks FD of Rs 90 lakh for public interest!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

हिंगोली : बेड, ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी हेळसांड आपण सर्व पाहत आहोत. देशात असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना वेळेत औषध मिळाले नाही म्हणून आपले प्राण सोडावे लागले आहे. अशा परिस्थिती राज्यातील एका आमदाराने इतर लोकप्रतिनिधीने एक आदर्श घालून दिली आहे. त्यासाठी त्या आमदारांनी चक्क आपली ९० लाख रुपयांची एफडी मोडली आहे.
जनतेच्या सेवेसाठी हिंगोली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची एफडी मोडली आहे. देशभरात कोरोनाने थैमान घातला आहे. तीच परीस्थिति हिंगोली भागात आहे. यावर मार्ग काढण्यासाठी संतोष बांगर पुढे आले आहे.
राज्यातील इतर भागाप्रमाणे हिंगोलीतही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पहिल्यांदा त्यांनी ९०० रुपये दराने ५०० इंजेक्शन आणले. पण नंतर इंजेक्शनचे भाव वाढले आणि ते घेण्यासाठी त्यांच्याकडे लाईन लागली. जिल्ह्यातील इंजेक्शनचा साठा संपला. मग हे इंजेक्शन मागविण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. सरकारी कामासाठी इतकी मोठी रक्कम गुंतवायला दुकानदार तयार नव्हते. कारण, सरकारी कामांना होणारा विलंब आणि व्याजाचा बसणारा भुर्दंड त्यामुळे व्यावसायिकांनी त्याला नकार दिला.
तेंव्हा संतोष बांगर यांनी स्वतःची ९० लाखाची एफडी मोडून एका खासगी वितरकाला तब्बल ५ हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली. आता जेव्हा सरकारी कामकाजानुसार वितरकाला पैसे मिळतील तेंव्हा बांगर यांना ते पैसे परत मिळतील.
हिंगोली जिल्ह्यासाठी एकून १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन हवे होते. पण जिल्हा प्रशासनासमोर असा प्रश्न उभा राहिला कि, ही रक्कम तत्काळ कशी उभी राहणार? पण माझ्या खात्यावर ९० लाखांची एफडी होती. ती मोडली आणि आणि दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *