Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचाआमदार अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले...

आमदार अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले…

अकोला : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा काल निकाल लागला असून यामध्ये भाजपचे समाधान अवताडे यांचा विजय झाला आहे. ही निवडणूक पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे घेण्यात आली होती. महाविकास आघाडीचे भगीरथ भालके व भाजपचे समाधान अवताडे यांच्यात चुरशीची लढाई पहावयास मिळाली असून भाजप व महाविकास आघाडीसाठी मोठ्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. त्यामुळे कोरोना काळातही गर्दी करुन मोठ मोठ्या सभा घेण्यात आल्या होत्या. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली असून यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भाजवर जोरदार टीका केली आहे.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, ‘भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले.” असे व्टिट आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, ”फारच लवकर उन्मत्त झालात. तिकडे पश्चिम बंगाल मध्ये तुमच्या विश्वगुरू पासून, संन्याशापर्यंत अख्खे तंबू ठोकून होता. तुमचा दारुण पराभव म्हणजे एका ममता नावाच्या वाघीनीने अख्याचे थोबाड रंगवले त्याचं काय? जास्त हवेत जाऊ नका पाटील गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे थोबाड रंगवले गेले आज. अशा शब्दात त्यांनी भाजपला लक्ष करत टीका केली आहे. पंढरपूरमध्ये भाजपचा उमदेवार विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली होती. त्यांला आमदार मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.

समाधान अवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासरखा चंद्रकांत पाटील यांनी अशी खोचक टीका काल विजयानंतर केली होती. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष करत पटलवार केला आहे. भाजपने पंढरपूरमध्ये विजय मिळविला असता तरी मात्र बंगाल मध्ये मोठी नामुष्की भाजपवर आली असून ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये विजय मिळवीला आहे. त्यामुळे तुमचा दारुण पराभव म्हणजे एका ममता नावाच्या वाघीनीने अख्याचे थोबाड रंगवले त्याचं काय?? असा सवाल करत भाजपवर आमदार मिटकरी बरसले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments