राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला झटका. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या एका नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. गेले काही महिने अब्दुल सत्तार हा पक्ष प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.
औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असणारी औरंगाबाद जिल्हा बँके शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. यामुळे शिवसेनेचे बळ अधिक वाढणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था हातात आल्याने पक्षाला फायदा होणार आहे.
याच निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ बागडे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीच मतदान २१ मार्चला पार पडले. यावेळी अब्दुल सत्तार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.