|

‘मेट्रोमॅन’ असणार केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Metroman will be Kerala's Chief Ministerial candidate
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

तिरुवनंतपुरम: ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ई. श्रीधरन यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.

केरळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला होता. केरळ भाजप कडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. इतर उमेदवारांची यादी देखील लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेन्द्रन यांनी सांगितले. 

गेल्या १० वर्षापासून ई. श्रीधरन केरळ मध्ये राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जवळून काम केले आहे. ते विकास कामांबाबत प्रयत्नशील आहे. त्यांनीच मला पक्ष प्रवेश करावा म्हणून प्रोत्साहीत केले असल्याचे ई. श्रीधरन यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले होते.

ई. श्रीधरन यांना त्यांच्या कामांमुळे जगभर ओळख आहे. ई. श्रीधरन यांची देशभर मेट्रो मॅन म्हणून ओळख आहे. त्यांच्या मुळे भारतीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलला. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे काम त्यांनी केले आहे. २०१९ त्यांना मानाचा पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *