सोनिया गांधी, सुप्रिया सुळे यांची भेट
राजकीय चर्चांना उधान
दिल्ली: राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. विरोधक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होतांना दिसत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीचे कारण अजून समजू शकले नाही. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. यात त्यांनी खूप खूप धन्यवाद.. मा. सोनिया गांधीजी तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी. तुमच्याशी संवाद साधण्यात नेहमीच आंनद होतो.’
शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी दिल्ली येथील निवासस्थानी डिनर आयोजित केले होते. याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती. या कार्यक्रमातून सुप्रिया सुळे या लवकर बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्या लवकर बाहेर पडून थेट सोनिया गांधी यांना भेटायला गेल्या होत्या याबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Thank you so much Hon. Mrs. Sonia Gandhi Ji for your valuable guidance. It’s always such pleasure interacting with you.
— Supriya Sule (@supriya_sule) March 25, 2021
महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व गोष्टींवर सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती,