|

सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही.

sanjay raut
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बेळगाव: बेळगाव लोकसभा पोटनिवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे बेळगाव मध्ये गेले आहे.
खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर १७ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे.

यावेळी समितीने. शुभम शेळके युवा कार्यकर्त्याला. उमेदवारी दिली आहे. त्याला सर्व ठिकाणावरून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेनं बेळगाव मध्ये शुभम शेळके याला पाठिंबा दिला आहे. शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत बेळगावला आले होते. त्यावेळी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले असल्याचा संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय आहे असे ट्विट संजय राऊत यांनी केले सहे.

काय म्हणाले संजय राऊत
बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले.सभा होणारच!गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *