परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस उपलब्ध करून देणार

Medical officers and nurses will be made available to deal with the situation
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई: राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार ५ हजार २०० वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, तसे त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यात आज ४७२८८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन २६२५२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २५४९०७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४५१३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८३.३६ टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने अधिकचे वैद्यकीय मनुष्यबळ लागणार आहे. याबाबत देशमुख यांनी हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात देण्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या २० एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या १५ हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या-त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.
राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करताना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *