ज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली,त्याच ठिकाणी माऊलीनेही आपलं आयुष्य संपवलं.

सोलापूर: ३१ डिसेंबरला पोटच्या गोळ्याने आत्महत्या केली, मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर आईचे मानसिक संतुलन बिघडले आणि अखेर त्याच ठिकाणी तीन महिन्यांनी माऊलीनेही आयुष्य संपवलं.
सोलापूर शहरात गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह मिळाला होता. बसवराज कोळी हे सकाळी नेहमीप्रमाणे गणपती घाट येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना तलावात महिलेचा तरंगणारा मृतदेह आढळला. ४० वर्षीय मृत महिलेचे नाव शारा भीमराव कोळी असल्याचे समोर आले. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या.
गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे कोळी यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी फौजदार पोलीस दाखल झाल्यानंतर अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या घटना विचारात घेऊन आता तलावाला संरक्षक जाळी अथवा भिंती बसवण्यात यावी अशी मागणी होत आहे.