पोलीस महासंचालकाच्या ‘त्या’ वक्तव्याचे सामनातून समर्थन
मुंबई: भ्रष्टाचार हा सिस्टीमचा भाग आहे. तो वेगळा करता येणार नाही असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले होते. या वक्तव्याचे सामनाच्या अग्रलेखातून समर्थन करण्यात आले आहे.
पोलीस संचालक यांनी केलेले वक्तव्य सहजपणे केलेल सत्यकथन आहे. नगराळे यांनी जनभावना व्यक्त केली आहे. अण्णाच्या आंदोलनाला भाजपने बळ पुरविले आहे. पण भाजपला सत्तेत आल्यानंतर लोकपालाचा विसर पडला आहे. भाजपने लोकपाल यांनी भ्रष्टाचाराला आळा घालता आला नाही.
भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र भ्रष्टाचार सिस्टीम भाग आहे. भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेतून बाहेर काढता येणार नाही. सरकारी यंत्रणेतून भ्रष्टाचार दूर करता येणार नाही. अस मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.
नगराळे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टिका करण्यात आली होती.