मास्टर ब्लास्टरचे चाहते चिंतीत!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: नुकताच सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.सचिनला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्याने शनिवारी याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सचिन सध्या होम क्वारंटाइन आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे. मास्टर ब्लास्टरला कोरोना झाल्याची बातमी समोर येताच त्याचे चाहते मात्र चिंतेत आहेत.

सचिनने सांगितले की, मी सलग माझी टेस्ट करुन घेत होतो आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व काळजी घेत होतो. तरीही मी कोरोनाच्या विळख्यात सापडलो आहे. मी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन सचिनने केले आहे.

सचिन भारत सरकारच्या करोनासंदर्भातील जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. अनेक क्रिकेटपटुंनी मास्क घालण्यासंदर्भात केलेल्या विशेष व्हिडीओमध्ये सचिनसोबत सौरभ गांगुली, राहुल द्रवीड यासारख्या खेळाडूंनी सहभाग घेत जनजागृती केली होती. काही दिवसांपूर्वीच सचिन रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचा अंतिम सामना खेळून परतल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जळच्या व्यक्तींच्या चाचण्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नियमांनुसार या व्यक्तींनाही करोना चाचणी करावी लागणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. नुकतीच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक दिग्गजांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *