भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग, १६ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Massive fire at Kovid Center in Bharuch, 16 killed, death toll likely to rise
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वृत्तसंस्था : देशात कोरोनाची स्थिती बिकट असताना आगीच्या घटना समोर येताना दिसत आहे. आधीच रुग्णांना बेड मिळत नाही त्यात अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. गुजरात मधून अशीच एक घटना समोर येत आहे. भरुच येथील कोरोना सेंटरला काल रात्री उशिरा भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळले नाही. यामध्ये रुग्णालयातील २ परिचारिका सुद्धा समावेश आहे.

भरुचमधील पटेल वेल्फेअर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर कोविड सेंटर तयार करण्यात आले होते. दरम्यान या कोविड सेंटरला काल रात्री उशीरा भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच तात्काळ फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी शर्तीने आग विझवली. मात्र या आगीमध्ये १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्ण जखमी झाले आहेत. जखमी रुग्ण व येथील बाकी रुग्णांना लगेचच दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.

या घटनेत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शंका भरुचचे एसपी राजेंद्रसिंह चुडासामा यांनी माहिती देताना शंका व्यक्त केली आहे. तसेच येथील ५८ जणांना रेस्क्यू करून त्यांना पर्यायी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *