Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचामराठा आरक्षण : राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसच्या कार्यालयावर सुद्धा दगडफेक

मराठा आरक्षण : राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसच्या कार्यालयावर सुद्धा दगडफेक

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला असून या निकालाचे राज्यभर पडसाद उमटले आहे. साताऱ्यात देखील मराठा आरक्षण निकालाचे पडसाद बघायला मिळाले असून शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर आता कॉंग्रेसच्या कार्यालयावर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सातारा येथील निवास्थानाबाहे शेणाच्या गोवऱ्या पटवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर सातारा शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना ताजी असताना आता कॉंग्रेसच्या सुद्धा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. साताऱ्यात मराठा आरक्षणावरुन चांगलेच वातावरण तापल्याये दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments