Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाभाजपच्या टीकेला ममता बॅनर्जी याचं उत्तर!

भाजपच्या टीकेला ममता बॅनर्जी याचं उत्तर!

माता-भगिनींचा आदर करण्यासाठी मी नंदीग्राम निवडले

कोलकत्ता: काल पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्याच्या वृद्ध आईचे निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. एक महिन्यापूर्वी भाजपने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला होता तेव्हा त्या चर्चेत आल्या होत्या. या वृद्ध महिलेच्या निधनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्विट करून तृणमूल कॉंग्रेसवर टीका केल्या होत्या.

याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सावध पवित्र्यात दिसल्या. वृद्ध महिलेच्या निधनामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याच्या वृत्तामुळे आपली बाजू सावरत त्या म्हणाल्या की, त्यांनी येथील माता व बहिणींबद्दलच्या आदरामुळे नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले. ममता बनर्जी यांनी भाजपवर  हल्ला चढविला आणि राज्यात भगव्या पक्षाला राजकीयदृष्ट्या “दफन” करण्याचे लोकांना आवाहन केले.

व्हीलचेयरवर काढलेल्या ‘पदयात्रे’ नंतर ममता बॅनर्जी यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्रामच्या सोना चुरा भागात एका जनसभेला संबोधित केले, त्या म्हणाल्या “मी इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविली असती, परंतु या ठिकाणच्या माता-भगिनींचा आदर करण्यासाठी मी नंदीग्राम निवडले आहे. नंदीग्राम चळवळीला अभिवादन करण्यासाठी मी सिंगूर न निवडता नंदीग्राम निवडले.” त्या पुढे म्हणाल्या, “लक्षात ठेवा मी एकदा नंदीग्राममध्ये प्रवेश केला तर मी पुन्हा नंदीग्राम सोडणार नाही. नंदीग्राम हे माझे स्थान आहे, मी इथेच राहीन.”

ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातील माजी नेते आणि आता भाजपाचे नेते असलेल्या सुवेन्दु अधिकारी यांच्या विरोधात उभ्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात येत्या १ एप्रिलला या मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments